यावली सालसे राज्य मार्गाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात माढ्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे आक्रमक आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

यावली सालसे राज्य मार्गाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात माढ्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

यावली सालसे राज्य मार्गाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात माढ्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

              माढा (कटूसत्य वृत्त):- यावली सालसे राज्य मार्गाचे माढा शहरात रखडलेल्या कामाच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने माढ्यात ठिय्या आंदोलन व रास्ता रोको  करण्यात आला.स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शिवसेनेने  केलेले  हे आंदोलन आक्रमक स्वरूपाचे ठरले.

              शहराध्यक्ष शंभु साठे,भैय्या खरात यांनी शिवसैनिकांसमवेत सकाळी ९ वाजताच छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ठिय्या धरला होता.त्यानंतर दुपारी रास्ता रोको करुन राज्य मार्गाचे संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा निषेध नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभाग आणी संबधित ठेकेदाराच्या विरोधात भाषणातुन रोष व्यक्त केला.

              सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ट  अधिकारी आंदोलन स्थळी आल्यानंतर आंदोलक व अधिकार्या मध्ये जोरदार शाब्दिक खंडाजगी झाली.शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजीराव सावंत यांनी आंदोलन स्थळी येऊन मुख्य कार्यकारी अभियंत्यांना  खडे बोल सुनावत धारेवर धरुन  चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना दिल्या.रोकडोबा मंदिर पासुन पुढील  काम झालेले नसल्याने नागरिक वैतागलेत.परिणामी अनेक आंदोलने या राज्य मार्गाच्या कामासाठी करुन देखील दखल घेतली गेली नसल्याने शिवसैनिकांनी घोषणाबाजी करुन मागण्या प्रश्नी आवाज उठवला.आंदोलनात शंभु साठे,भैय्या खरात,मुन्ना साठे, गौतम शिंदे,आबा साठे,बाळासाहेब भांगे,समाधान सुतार स्वप्निल खरात,अरविंद खरात यांचेसह अन्य शिवसैनिक सहभागी झाले होते.आंदोलन स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा,पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी  चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

लेखी ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे-

              प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सा.बा.विभागाचे मुख्य अभियंता श्री. चौगुले,एस.एन.नाईकवाडी,आनंद नाझरे, याच्या समवेत आंदोलकाची चर्चा झाली.अनेक शाब्दिक खंडाजगी उडाल्यानंतर  एक महिन्यांच्या आत काम पुर्ण करुन देतो असे ठोस लेखी  आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages