माढा मतदारसंघातील रेल्वेच्या दोन मागण्या प्रश्नी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

माढा (कटुसत्य वृत्त): माढा लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेली अनेक वर्षांपासून माढा रेल्वे स्टेशनवरील प्रलंबित असलेल्या माढा वैराग मार्गावरील माढा रेल्वे गेट च्या ठीकाणी उड्डाण पूल बांधावा तसेच
माल उतरविण्यासाठी मोठे शेड उभारावे त्यासाठी लागणाऱ्या सुविधा माढा रेल्वे स्टेशन वर उपलब्ध कराव्यात या दोन मागण्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आल्यात.
दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंत्री दानवे यांची भेट घेऊन निवेदन देऊन दोन्ही मागण्या प्रश्नी चर्चा करुन निवेदन दिले.तातडीने दखल घेऊन हे प्रश्न लवकरच सोडवण्यात येतील अशी ग्वाही खासदार निंबाळकर यांना मंत्री दानवे यांनी दिली आहे.
माढा हे लोकसभा व तालुक्याचे ठिकाण असुन या शहरातील रेल्वे स्टेशन वर व्यापारी शेतकरी जे माल घेऊन येत असतात त्यांना माल चढवण्यासाठी व उतरवण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत.त्यामुळे त्यांना सोलापूर रेल्वे स्टेशनवर जावे लागते.यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असुन गैरसोय ही होत आहे.
माढा रेल्वे स्टेशनवर रेक पॉईंट,गोडाऊन,माल उतरवण्यासाठी मोठे गोडाऊन चे शेड, व यासाठी लागणाऱ्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात.श्री क्षेत्र तुळजापूर ला जोडला जाणाऱ्या माढा वैराग मार्गावर माढा गेटवर रेल्वे क्रॉसिंग आहे.त्यामुळे रोडवरून येताना जाताना शाळेचे विद्यार्थी,नोकरीवर जाणारे लोक,व्यापारी,तसेच तुळजापूर कडे जाणारे भाविक ,यांना रेल्वे गेट पडल्यानंतर तासनतास त्याठिकाणी थांबावे लागते.त्यामुळे विद्यार्थी व नोकरदारांसह शेतकरी,सामान्यांचे हाल होत आहेत.त्यांचा वेळ वाया जात आहे.अनेक वर्षापासून नागरीकांची उड्डाण पूल करण्याची मागणी असुन मंजुरी दिल्यास प्रश्न मार्गी लागणार आहे.दोन्ही मागण्या कडे लक्ष घालुन मार्गी लावण्याची आग्रही मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंत्री दानवे यांच्याकडे केलीय.
No comments:
Post a Comment