स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हुतात्मा सार्व. वाचनालयात ग्रंथप्रदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हुतात्मा सार्व. वाचनालयात ग्रंथप्रदर्शन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हुतात्मा सार्व. वाचनालयात ग्रंथप्रदर्शन


               सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त हुतात्मा सार्व. वाचनालयात मागील ५ दिवसापासून सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरु आहे. यानिमित्ताने वाचनालयास आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रंगीत पताका आणि फुग्यांचे सजावट करण्यात आली आहे. दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान दररोज स. ९.०० वाजता ध्वजारोहण क्रमश: वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलीक मोरे, ग्रंथपाल सौ. वृषाली हजारे, ॲड. इस्माईल शेख यांच्या हस्ते करण्यात आले. दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेले सर्व हुतात्म्यांचे चरित्र आणि आजपर्यंत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तींच्या पुस्तकांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे ग्रंथालय निरिक्षक मा. प्रमोदजी पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कॉंग्रेस सेवा दल शहर अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी भुषविले. सोलापूरच्या हुतात्मा स्मारकात अशा पध्दतीचे प्रदर्शन भरविल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. सर्व वाचक, हितचिंतक, स्पर्धा परिक्षेचे विदयार्थी यांनी याचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. सदर कार्यक्रमास वाचनालयाचे उपाध्यक्ष ग्रंथमित्र जयंत आराध्ये, कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, ग्रंथपाल सौ. वृषाली हजारे, लिपिक सारिका माडीकर, सेवक दत्ता पोलके, प्रथमेश बनसोडे, अनिस खतीब, अमित गायकवाड, रोहित राम, विनय होटकर, सोनाली विटकर, दत्तात्रय गुंटुक, नामपल्ली यन्नम, सुर्यकांत कांबळे, प्रथम जाधव, राहूल पवार यांच्यासह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.
               सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वृषाली हजारे यांनी केले तर आभार सौ. सारिका माडीकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages