सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा...

सांगोला (कटुसत्य वृत्त):- सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सणांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडावे, यासाठी विद्यालयात विविध सण साजरे करून त्या सणाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होत असते.
बहिण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून रक्षाबंधन सण साजरा केला जातो. आज विद्यालयात मुलींनी मुलांना राख्या बांधल्या. मुलांनी मुलींसाठी भेटवस्तू म्हणून पेन, पेन्सिल वह्या, कंपास आदी शालेय वस्तू भेट दिल्या. सदर सण साजरा करण्यासाठी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांची प्रेरणा मिळाली. सदर सण साजरा करणेकामी उत्सव प्रमुख शुभांगी पवार व चेतन कोवाळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment