काजोल भाग्यवंत-कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

कुर्डुवाडी(कटुसत्य वृत्त): छावा प्रतिष्ठान नवीमुंबईचा सामाजिक क्षेत्रातील छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२२ हा लऊळ ता. माढा येथील काजोल भाग्यवंत-कांबळे यांना प्रदान करत मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त राज खतीब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी खासदार व महाराष्ट्र राज्याचे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत,मराठी मालिकेतील रंग माझा वेगळा,माझ्या नवर्याची बायको,बाळुमामा,झिंगाट चित्रपटातील अभिनेते संभाजी माने,माजी सैनिक व उद्योजक सैनिक फेडरेशनचेअध्यक्ष समाधान निकम,मराठी मालीकेतील रंग माझा वेगळा,माझ्या नवर्याची बायको तसेच हिंदी चित्रपटातील अभिनेते बलराज माने,सामाजिक कार्यकर्ते व आमदार प्रतिनिधी निलेश म्हात्रे,छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक व अध्यक्ष अमित गडांकुश,सुनिल साठे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रामध्ये महीलांसाठी उल्लेखनीय काम केल्याची व छत्रपती संभाजी महाराज घरोघरी पोहचले पाहीजेत म्हणून शिवशंभू लेखी ऐतिहासिक परीक्षाची महाराष्ट्र युवती प्रमुख जबाबदारी योग्य पणे सांभाळली याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
छावा प्रतिष्ठान नवीमुंबई महाराष्ट्र राज्याचा हा पुरस्कार वितरण सोहळा मराठी साहित्य मंदीर सभागृह वाशी नवी मुंबई,येथे संपन्न झाला.पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment