मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा शिरकाव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा शिरकाव

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा शिरकाव

               मुंबई, (नासिकेत पानसरे):- शिवसेनेत सर्वात मोठे बंड झाल्यानंतर ४० आमदार शिंदे यांच्या सोबत गेल्याने सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले.या सरकारला मंत्रीमंडळ विस्तार करताना मोठी कसरत करावी लागली जवळपास चाळीस दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला.या पहिल्या विस्तारात ठाणे जिल्ह्यातील एकाही आमदाराचा समावेश नाही, मात्र भाजपाच्या रविंद्र चव्हाण यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला असून आता त्यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा असल्याने मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे.

               राज्यातील या सत्तांतरा सोबतच राजकारणात अनेक मोठे बदल पहायला मिळत आहेत.बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे गट आपणच खरी शिवसेना आहे असे सांगत आहे तर दुसरीकडे ठाकरेंकडून मोठा विरोध होत आहे. ठाकरे विरुद्ध शिंदेगटचा वाद आता सुप्रीम कोर्टात आणि राज्य निवडणूक आयोगाच्या दारात आहे. हा संघर्ष सुरू असतानाच आता भाजपने सेनेच्या ठाण्यात फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 

               नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या ठाण्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. मात्र भाजपने रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.रविंद्र चव्हाण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप आपलं काम साध्य करू शकते असंही बोललं जात आहे आणि त्यामुळेच रवींद्र चव्हाण यांना ठाण्याचे पालकमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.  

               शिंदे-फडणवीस सरकारचा सुमारे ४० दिवसानंतरच्या विस्तारात एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून भाजपाच्या रविंद्र चव्हाण या एकाच आमदाराने कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.आता रविंद्र चव्हाण यांना ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रवींद्र चव्हाण यांच्याच माध्यमातून भाजप आता शिवसेनेचे ठाणे काबीज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

               ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड मानला जातो. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपंचायतींमध्ये शिवसेनेचे चांगले वर्चस्व आहे. शिवसेनेचा हा गड एकनाथ शिंदे हेच सांभाळत होते. मात्र, एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने शिवसेला फटका बसला त्यातच आता शिंदेंचं वर्चस्व कमी करुन भाजप आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages