वाचनवेल प्रतिष्ठानचा वार्षिक स्नेह मेळावा ६ व ७ ऑगस्टला भोसरीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

वाचनवेल प्रतिष्ठानचा वार्षिक स्नेह मेळावा ६ व ७ ऑगस्टला भोसरीत

वाचनवेल प्रतिष्ठानचा वार्षिक स्नेह मेळावा ६ व ७ ऑगस्टला भोसरीत

भोसरी मध्ये शनिवारी, रविवारी वाचनवेल प्रतिष्ठानच्या स्नेहमेळाव्यास ज्येष्ठ साहित्यिकांची मांदियाळी. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, अच्युत गोडबोले, मनोज अंबिके, अनंत राऊत कुमार दादा, विनम्र भाबल आणि वाचनवेल प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रूपाली सोनवणे व वाचनवेल पुस्तक भिशी सदस्यांची उपस्थिती

                     पिंपरी, (कटुसत्य वृत्त):- नागरिकांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण व्हावी, पुस्तक वाचन चळवळीला चालना मिळावी, या उद्देशाने "वाचनवेल पुस्तक भिशी" सुरू करण्यात आली. ही पुस्तक भिशी पुढील वर्षात एक लाख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे. या मुख्य उपक्रमाबरोबरच विविध नामांकित साहित्यिकांचा वाचकांशी संपर्क व्हावा, म्हणून वाचनवेल प्रतिष्ठानने द्वितीय वार्षिक स्नेहमेळाव्याचे" आयोजन केले असून ६ अाणि ७ ऑगस्टला भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागॄह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती वाचनवेलच्या संस्थापक अध्यक्षा रूपाली सोनवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

                     सोमवारी (दि. १ ऑगस्ट) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे सदस्य डॉ. संतोष मोरे, दीपेश मोहिते, गणेश बनसोडे, किरण फलफले आदी उपस्थित होते.

                     यावेळी रूपाली सोनवणे यांनी सांगितले की, या मेळाव्यास नामांकित साहित्यिक, लेखक, कवी, अभिनेते, व्याख्याते उपस्थित राहणार आहेत. तसेच यामध्ये महाकरंडक स्पर्धेचा निकाल आणि विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

                     दिपेश मोहिते यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपूर्वी ४० वाचकांपासून सुरू झालेला पुस्तक भिशीचा उपक्रम दोन वर्षात दहा हजार वाचकांपर्यंत पोहोचला आहे. या पुढील वर्षात आणखी वाचकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने मोहिते यांनी केले.

                     गणेश बनसोडे यांनी सांगितले की, या मेळाव्यात शनिवारी (दि. ६ ऑगस्ट) पहिले सत्राचे उद्घाटन आणि वाचनवेल अखिल भारतीय महा करंडक काव्य स्पर्धेचा प्रारंभ ज्येष्ठ कवी अनंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ साहित्यिक राजन खान, अच्युत गोडबोले, मनोज अंबिके, वास्तु विशारद कुमार दादा, अभिनेते विनम्र भाबल यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता होणार आहे.

                     दुसरे सत्र आणि स्पर्धेचा दुसरा भाग दुपारी अडीच वाजता. तसेच स्नेह मेळावा सायंकाळी पाच वाजता होईल, असेही गणेश बनसोडे यांनी सांगितले.

                     डॉ. संतोष मोरे यांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी रविवारी ( दि. ७ ऑगस्ट) सकाळी साहित्यिक, प्रकाशक, वाचक, वितरक यांचा आनंद सोहळा होणार आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता स्पर्धकांचे सादरीकरण,९ वाजता वाचनवेलची प्रस्तावना, ९:३० वाजता प्रसिद्ध लेखक मनोज अंबिके यांचे "वाचनातून स्व विकास" या विषयावर व्याख्यान, सकाळी  १०:३० वाजता प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची दीपेश मोहिते मुलाखत घेतील. सकाळी ११:३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांचे सा"हित्य आणि माणूस" या विषयावर व्याख्यान होणार आहे. स्नेहभोजनानंतर दुपारी  २:१५ वाजता "महाकरंडक स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण सोहळा" होणार आहे अशीही माहिती डॉ. संतोष मोरे यांनी दिली.

                     किरण फलफले यांनी सांगितले की, दुपारी ३ वाजता वाचनवेल पुस्तक भिशी सदस्यांचे मनोगत, संस्थापक अध्यक्ष यांचे भाषण आणि अध्यक्ष भाषण अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेह मेळाव्यास साहित्य क्षेत्रातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन वाचनवेल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. या स्नेहमेळाव्यास सर्व साहित्यिक, लेखक, कवी आणि वाचकांना मोफत प्रवेश असून इच्छुकांनी प्रवेश पत्रिकेसाठी 9527862918, 8668899331, 8668899331. या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रूपाली सोनवणे यांनी केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages