अंगणवाडी सेविकांना एड्स जनजागृती, रक्त चाचणी प्रशिक्षण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 25, 2022

अंगणवाडी सेविकांना एड्स जनजागृती, रक्त चाचणी प्रशिक्षण

अंगणवाडी सेविकांना एड्स जनजागृती, रक्त चाचणी प्रशिक्षण


                    पंढरपूर, (कटुसत्य वृत्त):- एचआयव्ही, एड्स आजाराबाबत समाजात अनेक समज गैरसमज आहेत.  त्यामुळे त्या रुग्णांना अधिक मानसिक त्रास होतो. समाजात या रोगाबाबत जनजागृती व्हावी तसेच लक्षणे असणाऱ्या रुग्णांची रक्त चाचणी  घेण्याबाबतचे  प्रशिक्षण जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक कार्यालय, सोलापूर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील एआरटी व आयसीटीसी विभाग एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी सेविकांना एड्स जनजागृती व रक्त चाचणीबाबत  प्रशिक्षण देण्यात आले.

                    उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एचआयव्ही, एड्स होण्याची कारणे, या आजाराबाबत समाजातील समज व गैरसमज तसेच एआटी उपचार प्रणालीबाबत वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

                    यावेळी कार्यक्रमास  बालविकास अधिकारी वर्षा पाटील, पर्यवेक्षक सविता साठे, श्रीमती वाडेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे दीपक गोरे, एजाज बागवान तसेच अंगणावाडी सेविका उपस्थित होत्या. हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीयअधिक्षक डॉ.महेश माने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पुरुषोत्तम कदम यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages