लोणविरे येथे सोयाबीन पिक परिसंवाद संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त) महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त लोणविरे ता. सांगोला येथे दिनांक १३ ऑगस्ट रोजी सोयाबीन पिक परिसंवाद व प्रत्यक्ष शिवार फेरी आणि भरडधान्य उत्पादन तंत्र व कृषी विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन शेतकरी मेळावा* या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच साहेबराव माने हे होते . सदर कार्यक्रमास श्री. शिवाजी शिंदे , तालुका कृषी अधिकारी सांगोला यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान,भरडधान्य तंत्रज्ञान ,सेंद्रिय शेती व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. डॉ.महादेव गायकवाड यांनी सोयाबीनच्या विविध अश्या २० प्रकारच्या वाणांची लागवड केलेले प्रत्यक्ष प्लॉट व त्यांची वैशिष्ट्ये, सोयाबीन खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व रोगकिड व्यवस्थापन, करडई लागवड तंत्रज्ञान, उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन आदि बाबी विषयी संपूर्ण माहिती प्रत्यक्ष शिवारफेरी करून दिली. संजय दिघे यांनी सेंद्रिय शेती विषयी माहिती दिली. सांगोला तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असून MACS1188, JS9305, KDS 726(फुले संगम), MAUS 71 आदी वाणांची लागवड झालेल्या प्लाॕटची प्रत्यक्ष शिवार फेरीमध्ये पाहणी करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम प्रत्यक्ष शेत शिवारामध्ये झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मंडळ कृषि अधिकारी जवळा श्री रमेश भंडारे, कृषी सहाय्यक शिवाजी बर्गे,श्रीधर शेजवळ, उत्कर्ष चंदनशिवे,संदीप कोळवले, बाळासाहेब सावंत तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment