पारे येथील गायकवाड कुटुंबाला आपुलकी प्रतिष्ठानने किराणा मालाची मदत देऊन जपली आपुलकी! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

पारे येथील गायकवाड कुटुंबाला आपुलकी प्रतिष्ठानने किराणा मालाची मदत देऊन जपली आपुलकी!

पारे येथील गायकवाड कुटुंबाला आपुलकी प्रतिष्ठानने किराणा मालाची मदत देऊन जपली आपुलकी!

           सांगोला (कटुसत्य वृत्त):- पारे येथील रुक्मिणी गायकवाड या रोजंदारी काम व शेळीपालन करतात. त्यातच त्यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे त्यांना विविध समस्याना सामोरे जावे लागत आहे. आपुलकी प्रतिष्ठानने त्यांना किराणा मालाची मदत करून आपुलकी जोपसण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

           पारे येथील रुक्मिणी गायकवाड या डोंगराच्या बाजूला राहतात. गेल्या चार दिवसाखाली त्यांच्या घराची भिंत पावसामुळे पडली. सुदैवाने ही भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आधीच गरिबी आणि त्यात संकट. अशा परिस्थितीत त्यांना थोडीशी मदत म्हणून आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने एक महिना पुरेल एवढा किराणा माल मदत म्हणून देण्यात आला. रुक्मिणी गायकवाड या आपल्या दोन गतिमंद भावांसोबत राहत असून पतीचे दहा वर्षांपूर्वी तसेच वडिलांचेही दोन वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळे या दोन गतिमंद भावांची जबाबदारी त्या याही परिस्थितीत सांभाळत आहेत. त्यांची एकुलती एक मुलगी आठवीच्या वर्गात शिकत असून दररोज ४ किमी पायपीट करून इतर मुलींबरोबर शाळेला जाते. या मुलीला शाळेत जाण्यासाठी लवकरच आपुलकी प्रतिष्ठान सायकल देणार असल्याचे आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी सांगितले.

           यावेळी पारे येथील माजी सरपंच तथा ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील, ग्रा. पं. सदस्य समाधान गंगणे,  बाळूनाना गायकवाड, पत्रकार नाना हालंगडे, डिकसळचे माजी सरपंच संतोष करांडे यांचे सह आपुलकी प्रतिष्ठानचे सचिव संतोष महिमकर, प्रमोद काका दौंडे, निलकंठ लिंगे, अरविंद डोंबे, महादेव दिवटे आदी उपस्थित होते.

           गरिबीने ग्रासलेल्या या कुटुंबाला थोडीशी का असेना आपुलकीची मदत मिळावी म्हणून किराणा मालाची मदत करण्यात आली. या कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम असल्यामुळे या कुटुंबाला आणखी मोठ्या मदतीची गरज आहे. त्यासाठी विविध संस्था, नागरिकांनी व समाजसेवी संघटनांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages