डॉ. दीपा सावळे विद्या व्यासंगात रमलेल्या ज्ञानयात्री- डॉ. पाटणे
प्राचार्य डॉ. दीपा सावळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- प्राचार्य दीपा सावळे या विद्या व्यासंगात रमलेल्या ज्ञान यात्री आहेत. त्यांनी ग्रंथ लेखन, संशोधन, आणि प्रशासन या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या अक्षरमुद्र उमटविल्या आहेत प्राचार्य डॉ.सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार हा ज्ञानात्मक गुणवत्तेचा सार्थ गौरव असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी केले.
परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सावळे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करून निरोप देण्यात आला.यावेळी डॉ.पाटणे बोलत होते या कार्यक्रमास डॉ.अशोक मोहेकर,प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख,प्राचार्य डॉ.वसंत सानप, माजी प्राचार्य डॉ.चंद्रकांत मोरे प्राध्यापक डॉ.ए.डी.जाधव प्राध्यापक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव तथा निमंत्रक संजय निंबाळकर उपस्थित होते. डॉ.सावळे यांनी लिहिलेल्या स्मृतीच्या झरोक्यातून शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय विकासाची वाटचाल,माझा जीवन प्रवास व उस्मानाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व देवता या तीन पुस्तकाचे प्रकाशन व डॉ. सावळे यशोदीप गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांचे स्वागत करण्यात आले.पुढे बोलताना डॉ.पाटणे म्हणाले शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री भवानी शिक्षण संस्थेच्या रूपाने ज्ञानाचे चैतन्य पीठ उभे केले.संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी महाविद्यालयाचा गुणात्मक आणि रचनात्मक विस्तार केला. गुणवत्तेची कदर असणारे शिक्षण महर्षीच सामान्य माणसातून माणीक मोत्यासारखे रत्न निर्माण करतात.गुणवत्तेचा कस हा जीवनातील कठीण आव्हाने स्वीकारताना लागतो.खडतर प्रवास अनुभवाने मिळवलेले यश हीच खरी गुणवत्ता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.सावळे यांनी लिहलेल्या तीन पुस्तकाचे प्रकाशन
याप्रसंगी डॉ.दीपा सावळे यांनी लिहलेल्या "स्मृतीच्या झरोक्यातून शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय-विकासाची वाटचाल,माझा जीवन प्रवास,उस्मानाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व देवदेवता या पुस्तकांसह डॉ.सावळे यशोदीप गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment