मातोश्री विद्यालयात हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

मातोश्री विद्यालयात हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती

मातोश्री विद्यालयात हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती

                कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):-  सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर संचलित मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव येथे विद्यालयाचे मार्गदर्शक  सुशीलचंद्र अण्णासाहेब भालशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद वर यांच्या नियोजनाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाची  जनजागृती व प्रसार करण्यासाठी प्रभात फेरी काढून सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले.या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा मन मन तिरंगा,तिरंगा हमारी जान,तिरंगा हमारी शान,तिरंगा ध्वज घरो घरी लावा अशा घोषणा देऊन तिरंगी ध्वज घरोघरी लावण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी विद्यालयातील सहशिक्षक कापरे गायकवाड,रिकीबे,धांडे यांसह शिक्षकेतर कर्मचारी माधव माने अशोक कांबळे शिवाजी खारे व बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages