सर्वोत्कृष्ट देखावा सादर केल्याने पोलीस स्टेशनच्या वतीने मंगलमूर्ती तरुण मंडळाचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 30, 2022

सर्वोत्कृष्ट देखावा सादर केल्याने पोलीस स्टेशनच्या वतीने मंगलमूर्ती तरुण मंडळाचा सन्मान

 सर्वोत्कृष्ट देखावा सादर केल्याने पोलीस स्टेशनच्या वतीने मंगलमूर्ती तरुण मंडळाचा सन्मान


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गणेश उत्सव कालावधीत सर्वोत्कृष्ट समाज प्रभोदनपर सजीव देखावा सादर करून समाजाची जनजागृती केल्याबद्दल मोहोळ शहरातील नामांकित मंगलमूर्ती तरुण मंडळास मोहोळ तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने राहुल तावसकर व अमोल महामुनी यांना सन्मानित करण्यात आले.मोहोळ तालुका पोलीस स्टेशन शांतता कमिटीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी गणेश उत्सव काळात समाज प्रभोधनपर उपक्रम राबवणाऱ्या मंडळाचे कौतुक करत समाजभिमुख उपक्रम राबवणाऱ्या इतर मंडळाचाही सन्मान करण्यात आला.यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील पोलीस पाटील मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages