हर घर तिरंगा अभियान: सांगोल्यातील सर्व शासकीय कार्यालये सजली तिरंगी विद्युत रोषणाईने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 13, 2022

हर घर तिरंगा अभियान: सांगोल्यातील सर्व शासकीय कार्यालये सजली तिरंगी विद्युत रोषणाईने

 हर घर तिरंगा अभियान: सांगोल्यातील सर्व शासकीय कार्यालये सजली तिरंगी विद्युत रोषणाईने


सांगोला (जगन्नाथ साठे):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शासनाने राबविलेल्या "हर घर तिरंगा" अभियानाने संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या मनात देश प्रेम निर्माण झाले आहे. सर्वत्र देशभक्तीचे वातावरण तयार झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि काही घरांवर दि. 12 ऑगस्ट पासूनच देशभक्तीपर गीते आणि तिरंगी रंगाच्या विद्युत रोषणाईने परिसर प्रकाशमय झाला आहे. 

      सांगोला शहर आणि तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी  या योजनेत सहभाग घेतला असल्याचे दिसून येत आहे. सांगोला शहरातील सांगोला नगरपालिका तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इ कार्यालयाच्या स्वागत कमानीवर तिरंगी रंगाची नेत्रदिपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

      अनेक कार्यालयाच्या इमारतीवर तिरंगी रंगाची रोषणाई लावल्यामुळे हा परिसर उजळून निघाला आहे." सर्वत्र हरघर तिरंगा" च्या घोषणा आणि सोशल मीडियावर देशभक्तीपर गाण्यामुळे हर घर तिरंगा आहे अभियान यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून तहसीलदार अभिजीत पाटील,नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे ,सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी ,पंचायत समिती सांगोल्याचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे , आणि त्यांचा प्रशासकीय स्टाफ  हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी झटत आहेत. वरील सर्वच अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. त्याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरातील काही घरांवर देशभक्तीचे गाणी नागरिकांनी लावली होती.

       सांगोला शहरात नगरपालिकेकडून, ग्रामीण भागात पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिरंगी झेंड्याची आणि त्या झेंड्याला लागणा ऱ्या काठयाची विक्री मोठ उ प्रमाणात झाले असल्याचे या बांबु विक्रेत्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages