महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- संभाजी ब्रिगेडची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

 महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण शहरांमध्ये पावसामुळे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे मुरूम व बांधकामाचे साहित्य टाकून बूजविण्यात येत आहे त्यामुळे सोलापूर शहरातील धुळीचे प्रमाण वाढून प्रदूषण वाढत आहे प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रदूषण महामंडळाचे नियंत्रक यांच्याकडे संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 

संपूर्ण शहरांमध्ये निष्कृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे त्यामुळे  महानगरपालिकेच्या वतीने आज आसरा रेल्वे पुलावरील खड्ड्यात मुरूम व बांधकामाचे साहित्य माती आजोरा टाकून खड्डे बुजविण्यात येत आहे पण या मुरमाची माती नागरिकांच्या डोळ्यात नाका तोंडात जात असल्यामुळे नागरिकांना श्वासनाच्या व डोळ्याचा विकाराचा त्रास सहन करावा लागत आहे महानगरपालिकेने रस्त्यावर खड्ड्यात बांधकामाचे साहित्याचे व मुरमाच्या आजोराने   हवेचे प्रदूषण होत असून या प्रदूषण करणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे उपशहर प्रमुख सिताराम बाबर कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष नागेश पवार संघटक संजय भोसले प्रसिद्धीप्रमुख इलिया शेख स्वप्निल तोडकरी रोहन गायकवाड शंतनू चोपडे इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages