जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
.png)
राजश्री शाहू महाराज इंग्लिश मीडियम तसेच विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष गणेश निळ आणि विकास जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी एस. व्ही. नीळ म्हणाले,"दीड दिवस शाळेत गेलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जगण्यासाठी मरणाऱ्या माणसांची कथा आपल्या साहित्यातून मांडली कोळशाच्या व्याघन खाली करण्याचं आणि गिरणी कामगार म्हणून काम करण्यास त्यांनी मुंबईला आल्यानंतर सुरुवात केली. सुशीतांचं कामगारांचा विषय जवळून पाहिलं आणि तेच त्यांनी साहित्यातून ठेवलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास साधा समुद्राच्या पलीकडे पोहोचविण्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे फार मोठे योगदान होतं. भारतीय स्वातंत्र्याचे यज्ञकुंडात प्रचंड मोठं योगदान देणाऱ्या मातंग समाजातील फकीरा या क्रांतिकारकावर त्यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली आणि ती अजरामर झाली. वारणेचा वाघ, माकडीचा माळ, चित्रा, वैजयंती, चंदन, गुलाम आधी कादंबऱ्या आणि कथा कथांमधून अण्णांनी हृदयस्पर्शी लिखाण केलं. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी त्यांना भाऊंचा सिंहाचा वाटा होता.
समाजाला नवी दिशा देण्याचे काम त्यांच्या साहित्याने केले उपेक्षित समाजाचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्या लेखणीने काम केलं. म्हणूनच त्यांचं साहित्य जगभरातील 27 भाषेत पोहोचले. गुलामगिरीच्या चिखलात ऋतून न बसता संघर्ष करून चमकदार क्रांती करणारे क्रांतिकारी विचार देताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आक्रमक शब्दात बोलले__ते म्हणाले ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या आणि दलितांच्या हातावर स्थिरावली आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका पुनम कापसे, अश्विनी निळ, एम आर माने, एस डी माने, मीरा माने, तेजश्री कुलकर्णी, सय्यद अस्मा, प्राजक्ता जाजू, प्राजक्ता पाटील, संगीता काटे, स्वप्निल शिंदे, संकेत मोरे, वैभव मसलकर, माऊली भोसले आधीच सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment