प्राचीन जगदंबा मंदिर जतन करण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम‌ ;जिल्हाधिकारी करणार पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

प्राचीन जगदंबा मंदिर जतन करण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम‌ ;जिल्हाधिकारी करणार पाहणी

प्राचीन जगदंबा मंदिर जतन करण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम‌; जिल्हाधिकारी करणार पाहणी

                      मोहोळ (कटुसत्य वृत्त): मोहोळ पंढरपूर पालखी मार्गावरील पोखरापूर येथील प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर जतन करण्याबाबत ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका ठाम असून याबाबत घेतलेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर हे पोखरापूर येथील जगदंबा मंदिर परिसराची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धोंडीबा उन्हाळे यांनी दिली.

                      मोहोळ-पंढरपूर पालखी महामार्ग क्र. ९६५ साठी संपादित क्षेत्रात पोखरापूर येथील प्राचीन जगदंबा मंदिर येत आहे.प्राचीन जगदंबादेवीचे मंदिर जतन करण्याबाबत ग्रामस्थांनी व ट्रस्टच्या वतीने घेतलेल्या ठाम 

                      भूमिकेमुळे व बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी डाँ.मिलिंद शंभरकर हे प्राचीन जगदंबा मंदीर परिसर व  पोखरापूर गावाजवळ असलेली सलग सात अपघाती वळणे, जगदंबा मंदिराच्या मागे असलेल्या ओढ्यावर प्रवाहाच्या चुकीच्या दिशेने बांधलेल्या पुलाच्या तक्रारी संदर्भात पाहणी करण्यासाठी समक्ष भेट देणार आहेत.

                      जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या दालनात प्राचीन जगदंबा मंदिराचे जतन करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक केशव घोडके, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक वि. पु.  वहाणे, भूसंपादन अधिकारी नागेश पाटील, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक एस. डी.शिंदे, विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धोंडीबा उन्हाळे,दगडू आगलावे , शिवाजीराव बाबर , नंदकुमार कदम, रणजीत उन्हाळे, बाळासाहेब खंदारे, श्रीधर उन्हाळे, सचिन दळवे, राहुल गुरव,ठेकेदार प्रतिनिधी सनी पवार आदी उपस्थित होते.

                      शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये संचालनालय, मुंबई यांनी १७ जून२०२२ रोजी जिल्हाधिकारी सोलापूर व प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पंढरपूर यांना देण्यात आलेल्या पत्रानुसार सदर मंदिर हे‌ प्राचीन आहे.राज्यातील संरक्षित स्मारके तसेच असंरक्षित ऐतिहासिक वारशाचे संरक्षण व जतन करण्याची संयुक्तिक जबाबदारी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये, संचालनालय तसेच संबंधित जिल्हा प्रशासनाची आहे. सदर प्रस्तावित महामार्गाची प्रकल्प आखणी करण्यापूर्वी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र घेतले नाही. सद्यस्थितीत प्राचीन जगदंबा मंदिराची हानी होणार नाही यासाठी सदर महामार्गाचे पुनसर्रेखन करणे, हा उचित पर्याय आहे. सांस्कृतिक वारशाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी असे शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डांँ. तेजेस म. गर्गे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages