म्हाडा टॉवर्स रहिवाशांच्या पाणी समस्येवर आमदार सुनील राऊत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलें - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 30, 2022

म्हाडा टॉवर्स रहिवाशांच्या पाणी समस्येवर आमदार सुनील राऊत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलें

 म्हाडा टॉवर्स रहिवाशांच्या पाणी समस्येवर आमदार सुनील राऊत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलें


 मुंबई (नासिकेत पानसरे):- विक्रोळी कन्नमवार नगरातील नव्यानें उभारलेल्या संक्रमण शिबिरातील म्हाडा टॉवर्स ७ ए, बी, सी ,डी येथील रहिवाशांना गेली बरेंच दिवस पाण्याची समस्या भेडसावत आहे. या रहिवाशांनी आमदार सुनील राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनीं म्हाडा व मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी समस्या सुटली नाहीं तर संक्रमण शिबिराला पाण्याची स्वतंत्र लाईन द्या, असें आमदार सुनील राऊत यांनी अधिकाऱ्यांना सुनावलें. याप्रसंगीं माजी नगरसेवक उपेंद्र सावंत म्हाडा टॉवर ए चे अध्यक्ष विनोद नेमाने, सेक्रेटरी शशिकांत गांगुर्डे;  बी चे अध्यक्ष जितेंद्र सिंग संधू ,सेक्रेटरी छाया मसूरकर, खजिनदार विशाल यंदे, तसेच सी चे अध्यक्ष राजू मोरे आणि पुरुष व महिला रहिवासीवर्ग मोठ्या संख्येनें उपस्थित होता. रहिवाशी रविवारी म्हाडा टॉवर्स मधील रहिवाशांनी शिर्के ऑफिस वर मोर्चा नेला होता. सोमवारी याबाबत आमदार सुनील राऊत आणि माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत म्हाडा व मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्यें आमदार सुनील राऊत यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पाण्याची समस्या सुटत नाहीं तोपर्यंत तात्पुरती काय व्यवस्था करतां येईल, याकडें आमदार राऊत यांनी लक्ष वेधले. त्याप्रमाणे स्वतः राऊत आणि सावंत यांनी सर्विस रोड वरील पाण्याच्या प्रवाहाचे आटे संक्रमण शिबिराकडे वळवले. मंगळवारी म्हाडा संक्रमण शिबिरातील पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत म्हाडा टॉवर ८ ए बी येथील पाण्याचा वॉल कमी करून म्हाडा टाॅवर सातकडे वळविला, तरी म्हाडा टॉवर सातच्या पाण्याच्या टाक्या भरल्या नाहींत. त्यामुळें आतां कुठें त्रुटी आहेत, याचा शोध अधिकारी घेत आहे म्हाडा अधिकाऱ्यांच्या अंगाशी आले, कीं ते दुसऱ्यावर ढकलतात, असा अनुभव रहिवाशांना आल्यामुळें, आमच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपीं सोडवावी अशी येथील रहिवास्यांची मागणी पुढें येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages