चाळीस दिवसानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार एकाही महिलेला स्थान नाही; पुरुष प्रधान मंत्रीमंडळ

मुंबई, (नासिकेत पानसरे):- हिंदू आणि हिंदुत्वासाठी बंडखोरी करुन एकत्र आलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या डबल इंजिन ईडी सरकारला तब्बल चाळीस दिवसानंतर मुस्लिम समाजाचे दैवत असलेल्या मोहम्मद पैगंबर यांचे नातु इमान हुसेन यांच्या शहादत म्हणजे मोहरम दिवशी मुहूर्त मिळाला. भाजपाच्या ९ आणि शिंदेगटाचे ९ अशा १८ जणांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रीमंडळात एकाही महिलेचा समावेश नसून एकही राज्यमंत्री नाही. हे पुरुष प्रधान मंत्रीमंडळ असल्याची टिका होत आहे. मंत्रीमंडळावर भाजपचा अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसते. विशेष बाब अशी की, मुख्यमंत्र्यासह अपात्रतेची टांगती तलवार असूनही चार जणांचा यामध्ये मंत्रीमंडळात समावेश आहे.
भाजपाच्या ९ आणि शिंदे गटाचे ९ सदस्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली यामध्ये भाजपाचे कॉंग्रेस मधून गेलेले राधाकृष्ण विखेपाटील,सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावीत,गिरीश महाजन,सुरेश खाडे,रविंद्र चव्हाण,अतुल सावे,आणि मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे तर शिंदे गटातून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड,संदिपान भुमरे,उदय सामंत,तानाजी सावंत, अब्दुल सत्तार,दिपक केसरकर, शंभूराज देसाई अशा एकुण १८ जणांनी कँबिनेट मंत्री पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली. आता हे २० सदस्यांचे डबल इंजीन सरकार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह काही जणावर अपात्रतेची टांगती तलवार असूनही ते मंत्री पदावर बसणार आहेत.
तब्बल ४० दिवसामध्ये या सरकारचा विस्तार झाला हे चांगले झाले जनतेचे प्रश्न सोडविले जातील.पण ज्यांना अजून क्लिनचीट मिळाली नाही अशा लोकांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपनेच आरोप केले होते.त्या प्रकरणामुळे त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते.भाजपानेच त्यांच्यावर बेभान आरोप केले होते अशी टिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. एकाही महिलेला स्थान मंत्रीमंडळात नाही. यावर त्यांनी टिका केली.
भाजपाच्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचा एकेरी उल्लेख करीत पुण्यातील पुजा चव्हाण हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संजय राठोड याचा मंत्री पदावर समावेश झाला हे दुर्दैव आहे. माझा लढा चालूच राहणार अशी तिखट प्रतिक्रीया दिली आहे.तर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा मंत्रीमंडळात एकाही महिलेचे स्थान नाही. ज्यांना महिला फक्त चुल आणि मूल एवढ्यावर असावी अशी आपेक्षा आहे. त्यांच्याकडून काय आपेक्षा करायची असे म्हटले आहे.
संजय राठोड यांच्या आरोपा संबंधी भाजपाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरासावर करीत त्यांना पोलिसांनी क्लिनचीट दिली आहे यावर कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल. असे मत व्यक्त केले आहे तर शंभूराज देसाई आणि दिपक केसरकर यांनी राठोड यांच्यावर झालेल्या आरोपा विषयी पोलिसांच्या अहवालात क्लिनचिट दिल्याचे म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment