यावली येथे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

यावली येथे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

यावली येथे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

                पेनूर, (कटूसत्य वृत्त):- यावली (ता. मोहोळ) येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे १०२ वी जयंती कार्यक्रमानिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सोशल मीडिया प्रमुख संजीव खिलारे यांच्या शुभहस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

                यावली (ता. मोहोळ) येथे शशिकांत जाधव मित्रपरिवार मार्फत दि.१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लिखित पुस्तकाचे भेट म्हणून दिले. यासह सिद्धेश्वर विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

                यावेळी आयोजक शशिकांत जाधव, उपसरपंच सुरेश जाधव, वसंत जाधव, अशोक जाधव, गुंडू नाना जाधव, हरी जाधव, वैजनाथ जाधव, अभिजित दळवे, सिद्धेश्वर जाधव, सौरभ जाधव यासह मांगल्य परिवाराचे सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages