साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती थेऊर येथे मोठ्या उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती थेऊर येथे मोठ्या उत्साहात साजरी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती थेऊर येथे मोठ्या उत्साहात साजरी

                    थेऊर (कटूसत्य वृत्त):– थेऊर तालुका हवेली येथे बहुजन दलित महासंघ यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद शिवाजी वैराट होते.  थेऊरगावच्या विद्यमान सरपंच सौ. शितल काकडे यांचे हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी ठाणे शहराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे ,मा. पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

                    साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त करत असताना आनंद वैराट यांनी सांगितले की, दीड दिवस शाळा शिकलेले अण्णा भाऊ साठे यांनी कथा ,कादंबऱ्या, नाटक, लावण्या असे खूप मोठे साहित्य निर्माण केले. रशियामध्ये साता समुद्रा पार छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे पहिले शिवशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोलाचे योगदान, ज्या अण्णाभाऊ साठेंनी मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी लढा उभारला त्याच मुंबईमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल चुकीचे विधान केले त्याचा जाहीर निषेध केला. मा. पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे यांनी अण्णाभाऊ साठेंचे विचार घेऊन आजच्या तरुणांनी पुढे जावं असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्राहक संरक्षण चे लक्ष्मण चव्हाण, भगवान धारवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेलचे पांडुरंग काकडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी माजी उपसरपंच सुदामराव गावडे,मा.उपसरपंच दत्तात्रय कुंजीर पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. रूपाली रसाळ, जयश्री कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, संतोष काकडे, राहुल कांबळे, युवराज काकडे, थेऊर पोलीस चौकीचे सोनवणे,गोविंद तारु,शरद काकडे,विजय कांबळे,सागर राजगुरू,कैलास सावंत,दिलीप कुंजीर, सुखराज कुंजीर, संपत बिनावत, हिरामण लोंढे,विक्रम कसबे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी बहुजन दलित महासंघाचे मल्हारी रंधवे, शिवाजी कांबळे, सोमनाथ खंडागळे, महादेव कांबळे, राजेंद्र अवघडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव खंडागळे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे यांनी मानले 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages