दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- आर पी आय (आठवले गट) च्या वतीने युवा नेते आकाश जगताप यांच्या नेतृत्वाखाली भव्य रस्ता रोको आंदोलन कुर्डुवाडी बार्शी रोडवर,सम्राट अशोक नगर शेजारी,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आला.
स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली तरी या देशाच्या प्रस्थापितांच्या मानसिकतेमध्ये अजूनही बदल झाला नाही.राजस्थान मधील जालौर जिल्ह्यातील सुराणा या गावात ९ वर्षाचा इंद्रकुमार मेघवाल नावाच्या अस्पृश्यांच्या छोट्या बाळाने हेडमास्तरच्या मडक्यातील पाणी पिल्याने त्या हेडमास्तरने बाळाला अमानुष बेदम मारहाण केल्याने मुलगा मरण पावला.यवतमाळ मध्ये अस्पृश्य समाजाने आपल्या हळदीच्या कार्यक्रमात डॉ आंबेडकरांची गाणी लावल्याने त्यांच्यावर बहिष्कार घातला.तसेच दादर येथील इंदू मिलच्या जागेवर पूर्वी मान्य केल्याप्रमाणे हातात संविधान असलेला ३५० फुट उंचीचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा झालाच पाहिजे,राजस्थान मधील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,इथून पुढे मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार होता कामा नयेत.या व इतरही मागण्यासाठी हा रस्ता रोको करण्यात आला होता.
या प्रसंगी कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचा पोलीस फौजफाटा तैनात होता.घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शेकडो दलित बंधूू व भगिनी रस्त्यावर उतरल्या होत्या.हा रस्ता वाहतुकीसाठी तब्बल एक तास बंद असल्याने दुथर्फा वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.
या प्रसंगी सविताताई जगताप,जयश्रीताई माने,जयश्रीताई झिंगळे,शिलाताई रजपूत,विमलताई डांगे, सौदागर ताकतोडे, अर्जुन गाडे इत्यादींनी अत्याचारा विरुद्ध च्या आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी आकाश जगताप,बाळासाहेब शेंडगे,सुहास शेंडगे,राजाभाऊ दणाणे,रामचंद्र डांगे,विवेक वाघमारे, दशरथ कांबळे,पोपटराव भालके,पाटोळे साहेब,भीमसेन मिसाळ,सत्यवान जगताप, मिलिंद चव्हाण,प्रविण जगताप,हनुमंत जगताप,संजय तुपारे,सुनील कुमार शिंदे, गणेश जमदाडे अशिष रजपुत अक्षय करंडे समाज मुलांनी अतुल फरतडे साबेर चाऊस वसीम मुलानी अण्णा नायडू कृष्णा अस्वरे आकाश मोरे सौरभ गायकवाड विशाल मोरे जितू गायकवाड समाधान डावरे स्वप्निल जानराव बापू रकिबे संजय दुपारी रमा माता महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. एसी,एसटी,ओबीसी व मुस्लिम बांधव व भगिनी फारच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कुर्डुवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम बोधे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
No comments:
Post a Comment