आझादी का अमृत महोत्सवानिमित्त हॉकी स्पर्धेचे आयोजन

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-आझादी का अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महानगरपालिका यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन नेहरूनगर येथील शासकीय मैदानात करण्यात आले होते.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, म.न.पा. क्रीडा अधिकारी नजीर शेख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खेळाडूंनी 75चा अंक तयार करुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी शुभेच्छा दिल्या.
श्री. तारळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी मार्गदर्शन केले. क्रीडा स्पर्धेत राज मेमोरियल प्रशाला, एम.ए. पानगल, सहस्त्रार्जून प्रशाला, मॉडेल पब्लिक स्कूल, अरिहंत इ.मे.स्कूल, इंडियन मॉडेल स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, सुयश सेंट्रल स्कूल या शाळेच्या संघानी सहभाग नोंदविला.
यावेळी क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव व हॉकी सोलापूर संघटनेचे अध्यक्ष जरार कुरेशी यांच्या उपस्थित होते.
No comments:
Post a Comment