आ. बबनदादा शिंदे यांच्याकडे विठ्ठलवाडीच्या शिष्टमंडळाने केल्या विविध मागण्या

काही मागण्यांची त्वरित पूर्तता ; काहींबाबत दर्शविली सकारात्मकता
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सरपंच प्रतिनिधी तथा स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन अनिलकुमार अनुभुले व व्हाईस चेअरमन नारायण खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना स्थळावर आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडे गावातील काही प्रश्न व समस्येबाबत मागण्या केल्या असता त्यांनी जागेवरच काही मागण्यांची पूर्तता केली.काही मागण्याबाबत सकारात्मकता दर्शवत भविष्यात पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यामुळे शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर असलेल्या उबाळे ॲडिशनल कृषी डीपीचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली असता संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यास फोन करून काम सुरू करण्याच्या सूचना देऊन लेखी पत्र दिले.माढा ते उपळाई खुर्द- विठ्ठलवाडी मार्गे लोंढेवाडी-कुंभेज अशी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली असता आमदार शिंदे यांनी त्वरित कुर्डुवाडीच्या आगारप्रमुखांना फोन करून बस सुरू करण्याच्या सूचना दिल्या.विठ्ठलवाडी ते माढा स्टेशनसह इतर पाणंद रस्त्याचे खडीकरण व मुरमीकरण करण्याची मागणी केली असता ही कामे भविष्यात करणेबाबत सकारात्मकता दर्शविली.सध्या पंतप्रधान सडक योजनेतून माढा ते विठ्ठलवाडी या रस्त्याचे काम सुरू आहे याबाबत आमदार शिंदे यांनी शिष्टमंडळास सुचित केले की, हे काम शासनाच्या अधिका-याकडून दर्जेदार व चांगल्या पद्धतीचे करून घेणेबाबत लक्ष द्यावे. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांचीही भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक लुणावत,पतसंस्थेचे संचालक सौदागर गव्हाणे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे,सतीश गुंड, कैलास सस्ते,रमेश बरकडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment