विमलेश्वर विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी...


गोविंद भोसले यांचाही सन्मान
बेंबळे (कटुसत्य वृत्त) : श्री विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेंबळे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक सचिव श्री गोविंद भोसले यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव गोविंद भोसले यांचा 74 व्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
प्राचार्य अशोक बागवाले यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले तसेच प्राध्यापक गणपत कोळेकर यांनी अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यात दिलेल्या योगदानाचे व त्यांनी लिहिलेल्या कादंबर्यांची ओळख करून दिली , तसेच लोकमान्य टिळक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कणखर भूमिका स्वीकारली असे विचार व्यक्त केले . प्रा. बबन भोसले यांनी संस्थेचे संस्थापक सचिव गोविंद भोसले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याचा विशेष ऊल्लेख करून त्यांनी शैक्षणिक संस्था उभारण्याबाबत दिलेल्या योगदानाबद्दल या विमलेश्वर विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी गोविंद भोसले यांचा कायम ऋणी असेल असे मत व्यक्त केले व सर्वांनी एकत्रितपणे गोविंद भोसले यांचा विशेष सन्मान केला .
गोविंद भोसले यांनी , अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यात केलेल्या क्रांतीचा विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा व प्रत्येक विद्यार्थ्यांने लोकमान्य टिळकांच्या सारखे दृढनिश्चयी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करावा व आत्मचिंतन करावे असे विचार व्यक्त केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील बिभिषन कीर्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण भोसले यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष नागेश मस्के, संचालिका स्वाती पाटील, गावातील प्रतिष्ठित मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment