मुंबई मेट्रो मार्गिका ३ च्या सुधारित प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 10, 2022

मुंबई मेट्रो मार्गिका ३ च्या सुधारित प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई मेट्रो मार्गिका ३ च्या सुधारित प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता

                  मुंबई (नासिकेत पानसरे): कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.या प्रकल्पाच्या मूळ खर्चात २३ हजार १३६ कोटींनी वाढ झाल्याने आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख रुपयांचा हा सुधारित खर्च असेल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे.

                  सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाख वरुन ३ हजार ६९९ कोटी ८१ लाख एवढी होत आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आलेले आहेत.या सुधारित  वित्तीय आराखडयानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे कर्ज १३ हजार २३५ कोटीवरुन १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख एवढे झाले असून या वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.मुंबई मेट्रो मार्ग -३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके असून २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे.ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ ५० मिनिटात करणे सहज शक्य होणार आहे.सध्या बोगद्यांचे ९८.६ टक्के एवढे काम झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages