शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा


सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध स्पर्धांचे व भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्त भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा या अभियानांतर्गत कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा व पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धांचे आयोजन करण्या आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. दिनांक 13/8/2022 ते 15/8/2022 रोजी कॉलेजमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी संस्थेचे संचालक श्री. अंकुश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री. एम. आर. गायकवाड, युवा विश्वस्त डॉ. यशोदीप गायकवाड यांच्या हस्ते विविध स्पर्धेमध्ये क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर संचालक मंडळाने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज ते सांगोला शहरांमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये दोनशे हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या बाईक वर तिरंगा ध्वज लावून, देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण सांगोला शहरातून देशभक्ती, सर्वधर्मसमभाव व सामाजिक समतेचा संदेश दिला. ही तिरंगा रॅली कडलास नाका, वाढेगाव नाका, विद्या मंदिर प्रशाला, नेहरू चौक, महात्मा फुले चौक या मार्गाने काढण्यात आली. तिरंगि झेंडे, संदेश फलक, शिस्तबद्ध घोषणा देत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाईक रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध स्पर्धा व तिरंगा रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख, समन्वयक प्रा. डी एस खंदारे, प्रा. पी. सी. चव्हाण, प्रा. एम. एस. दौंड प्रा. पी जी पवार, प्रा. एस एम भोसले व प्रा. एस एस कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment