अकोले बु.जवळील ट्रक-अल्टोच्या भीषण पघातात पती-पत्नी ठार नातू जखमी

टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):- टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर अकोले बु.पाटी जवळ मालट्रक व अल्टो कारच्या भीषण अपघातात अल्टो मधील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून नातू गँभिर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वा.सुमारास घडली आहे.मृत पती-पत्नी टेंभुर्णीचे रहिवाशी आहेत.
गोरख मारुती माने (वय- ४५)व ताई गोरख माने (वय-४०) दोघे रा.टेंभुर्णी अशी अपघातात मयत झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत तर अनमोल शांतीलाल माने (वय-०२वर्ष) असे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गोरख मारुती माने व त्यांची पत्नी ताई गोरख माने वय हे दोघे आपल्या आल्टो कार (क्र-एम एच ०९ ए.बी ७२५४) यामधून पंढरपूरहुन नातू अनमोल यास घेऊन टेंभूर्णीकडे येत होते.दरम्यान ते अकोले बु.येथे आले असता दुपारी ०४ वा.च्या सुमारास समोरून पंढरपूरकडे जाणाऱ्या मालट्रकने (क्र-एम एच.आर-३०३३) ने अल्टो कारला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार मधील गोरख माने व ताई माने हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. तर त्यांचा नातू अनमोल माने(वय-०२)हा चिमुकला सुदैवाने बचावला.त्यास पायास गंभीर जखम झाली आहे.त्याचेवर टेंभुर्णी तील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्वतः धाव घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मयतांना टेंभुर्णी येथे पाठवून देऊन रस्त्यावरील वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
अपघातात मरण आलेले माने पती-पत्नी हे नातू अनमोल याचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी अनमोल यास आणण्यास पंढरपूरला गेले होते.मात्रयेताना वाटेत टेंभुर्णी जवळ त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातूचा वाढदिवस साजरा करण्याचे माने दांपत्यांचे स्वप्न अधुरे राहिले.या घटनेने टेंभुर्णीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment