सांगोला अर्बन बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात सांगोला तहसिल कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण


मनमानी आणि भ्रष्ट कारभार करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा
सांगोला (कटूसत्य वृत्त):– सांगोला शहरातील सांगोला अर्बन बँकेच्या विरोधात सांगोला तहसील कार्यालयासमोर वाटंबरे ता. सांगोला येथील संतोष पवार या शेतकऱ्याने कुटुंबीयांसह आमरण उपोषण व आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. सांगोला अर्बन को बँकेचे अधिकारी यांनी संगनमताने कर्जाची सर्व परतफेड केलेली असताना महसूल अधिकारी यांच्याशी संगणमत करून माझी जमीन गट नंबर 487/2/अ या गटाच्या जमिनीवर बँकेचे नाव लावून कर्जाच्या कारवाईच्या सुनावणीच्या नोटीस न देता माझी फसवणूक केली आहे. बँकेचे वसुली अधिकारी शिवाजी शिंदे हे अपमानास्पद वागणूक देवून दमदाटीची भाषा वापरून बघून घेण्याची भाषा करीत आहेत.तर तत्कालीन बँक मॅनेजर धर्मराज बोराडे,विष्णू पिसे ,पुजारी नामक बँकेचा कर्मचारी व मंडल अधिकारी पोकळे यांचे वर गुन्हा दाखल होईपर्यंत आमरण उपोषण व धरणे आंदोलन करीत असल्याबाबत च्या माहितीचा बोर्ड लावून धरणे आंदोलनात सुरुवात केली आहे.
अशा पद्धतीचे उपोषण सुरू झाल्यामुळे तालुक्यातील बँकेचे ग्राहक व ठेवेदार यांचे धाबे दणाणले आहेत.या पूर्वी बँकेच्या अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयास तक्रारी प्राप्त झाल्याने खातेदार आणि ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.बँकेविरोधात वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
शेती व्यवसायाचे कारणाने शेती व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून वाहनासाठी मी सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून बजाज पिक अप या वाहनासाठी कर्ज खाते नंबर 1141 प्रमाणे कर्ज घेतलेले होते. सदरील कर्जाचे हप्ते नियमित परतफेड करून सदरील पिकप वाहन आरटीओ नोंदणी क्रमांक एम एच.45 -3691 सदरील बँकेचे तत्कालीन शाखा अधिकारी धर्मराज बोराडे यांचे समक्ष व त्यांचे परवानगीने सदरील वाहन बापू कोडक रा. औंढी ता. जत जिल्हा सांगली यांना मालकी हक्काने विक्री केले होते. सदरील वाहना बाबत घेतलेल्या कर्जाची रक्कम पैकी वाहन विक्री केले बाबत कोडग यांच्याकडून रोख स्वरूपात रक्कम व उर्वरित कर्जाची रक्कम म्हणून आमच्याकडून 50 हजार रोख भरून घेऊन याप्रमाणे माझ्याकडून सदरील कर्ज खाते 11 41 वरील सर्व कर्ज बाकी परतफेड झालेने सदरील बँक शाखा यांचे कडून 2017 रोजी सर्व करत कर्ज परतफेड झाल्याबाबत ना हरकत दाखला व सदर नाहरकत बाबतची आरटीओ पेपर दिलेले होते. यानंतर स्वतः उपोषनकर्ते यांना बँकेचे कोणतेही देणे लागत नाही,परंतु सदरील बँकेचे तत्कालीन मॅनेजर यांनी मला गेली अनेक दिवसांपूर्वी सदरील कर्जाची रक्कम मंजूर करण्यासाठी स्वतःसाठी म्हणून दहा हजार रुपयाची मागणी केलेली होती, सदरील रक्कम देणेस नकार दिलेला होता, या बाबीचा राग मनात धरून सदरील तत्कालीन बँक मॅनेजर धर्मराज बोराडे यांनी कर्ज प्रकरण मंजूर करत असताना माझ्याकडून अनेक कोऱ्या पेपर व कोरे चेकवर सह्या घेतलेल्या होत्या.
सदरील कोरे पेपर वरील सही घेवून बँकेचे अन्य काही कर्मचारी यांनी संगणकमताने तक्रारादारास कोणतीही नोटीस न पाठवता परस्पर जमीन जप्ती करण्याची कारवाई केलेली आहे.सदरील बँकेची मी कोणत्याही देणे लागत नाही सदरील फसवणूक करून माझेविरुद्ध केलेली कारवाई खोटी आहे.याबाबत सदरील कारवाई करणारे बँकेचे वसुली अधिकारी शिवाजी शिंदे, विष्णू पिसे, श्री पुजारी बँक मॅनेजर बोराडे तसेच मंडल अधिकारी पोळके यांनी संगणमतांनी माझेविरुद्ध जमीन जप्तीबाबत खोटी कागदपत्रे उपविभागीय अधिकारी यांचे समोर सादर करून सदरील सुनावणीचे कोणतीही नोटीस मला मिळून न देता माझे जमीन जप्तीबाबत आदेश देऊन माझी जमीन मिळकतीवरील नाव कमी करून कोणतेही कर्ज बाकी नसताना माझे मिळकतीवर गैरपणे बँकेचे नाव लावून घेतले आहे.याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणती दखल घेतली जात नसल्याने मी माझे वर झालेले अन्यायाच्या कामे तहसील कार्यालय सांगोला येथे एक ऑगस्ट पासून माझ्या कुटुंबासह आमरण उपोषण करत धरणे आंदोलन करीत आहे. तरी मला व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास सदरील जबाबदार वसुली अधिकारी श्री शिवाजी शिंदे, विष्णू पिसे, श्री पुजारी ,धर्मराज बोराडे तसेच मंडल अधिकारी पोळके व सदरील बँकेचे भ्रष्ट कर्मचारी यांच्यावर ठेवून सदरील कर्मचारी अधिकारी यांचे विरोध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारेजिल्हा अधिकारी सोलापूर, जिल्हा उपनिबंधक सोलापूर, तहसीलदार सांगोला, पोलीस निरीक्षक सांगोला यांना निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment