
मुंबई, (नासिकेत पानसरे):- राज्यातील आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यू यावरून माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याने विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जोरदार शाब्दिक चकमक झाली.
शिवसेना युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी भागातील स्थिती पाहता आम्हा राजकर्त्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हटले त्यावर आक्षेप घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला.लाज वाटली पाहिजे म्हणजे यापुर्वी तुमचेच पिता मुख्यमंत्री होेते.मग त्याची लाज काढता का, असे सांगत असंसदिय शब्द वापरल्याबद्दल त्यांनी माफी मागावी किंवा शब्द मागे घ्यावा.असे ठणकावून सांगितले.
यावेळी सभागृहात चांगलाच गदारोळ झाला त्यावेळी यावर बोलताना आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा नेमका अर्थ सांगताना सरकारच्या कारभारावर समाचार घेत खरपुस टिका केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी ‘लाज वाटली पाहिजे’ हे वाक्य असंसंदीय असल्यास कामकाजातून काढलं जाईल स्पष्ट केलं.
सभागृहात शांतता झाल्यावर मी पुन्हा एकदा परत बोलतो असे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, “आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली आहेत, आपल्या राष्ट्रपती सुद्धा आदिवासी समाजाच्या आहेत. यावर्षी तरी आम्हाला असं उत्तर अपेक्षित नव्हतं. हे काय पाप आमचं, तुमचं नाही. जेव्हा आपण आदिवासी विभागात जातो, तेव्हा तिथे गेल्यानंतर राजकारणी म्हणून आपल्याला तेथील स्थिती पाहून लाज वाटली पाहिजे. ७५ वर्षांपासून ही स्थिती आहे. प्रश्न राखीव ठेवला असतानाही कुपोषणामुळे मृत्यू होत नाहीत, असं उत्तर मिळत आहे,” या उत्तरावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला.त्यावर सभागृहात रणकंदन माजले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आक्षेपार्ह बाब तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल असे सांगितले.
No comments:
Post a Comment