नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ

शिवसेना नगरसेवक सत्यवान देशमुख यांचा पाठपुरावा
मोहोळ (कटुसत्य वृत्त):- पक्षीय राजकारण आणि निधीअभावी प्रलंबीत असलेल्या मोहोळ येथील ग्रामदैवत नागनाथ मंदिर ते भांगेवस्ती आणि नरखेड रोड ते घागरे वस्ती या दोन रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोहोळ येथे करण्यात आला. अनेक वर्षानंतर श्रावण महिन्यात या रत्यांचे काम सुरू झाल्यामुळे शहरातील सिद्ध नागेश भक्तांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नागनाथ देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष सुरेशकाका घोंगडे यांच्या शुभहस्ते आणि जि.प. उपाध्यक्ष दीपक गायकवाड,माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, नागनाथ देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, शिवसेना नगरसेवक सत्यवान देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
शिवसेना नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यांसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडून निधी मंजूर करून आणला आहे.
यावेळी देवस्थान कमिटीचे सूर्यकांत कांचन, अप्पा घागरे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, शिवसेना शहर प्रमुख विक्रम देशमुख, महादेव इंगळे, युवासेना शहर प्रमुख सचिन जाधव,उल्हास वाले, ओंकार देशमुख, धनंजय कारंजकर, सत्यवान देशमुख, नगरसेवक महादेव गोडसे, सिकंदर बोंगे, सोमनाथ पवार,धनाजी शिंदे, शिवरत्न गायकवाड, सतीश गरड, अविनाश क्षीरसागर, अशोक गायकवाड, बिलाल बागवान, असलम बागवान, धीरज गायकवाड, सुनील गायकवाड, राजू गुंड, अमर कांबळे, सुरज जाधव, संजय कोरडे, राजाभाऊ गायकवाड, दिगंबर होनमाने, सचिन गायकवाड, अरुण गायकवाड, गणेश जाधव, सुहास आखाडे, सुलतान इनामदार यांच्यासह शहरातील शिवसेना पक्षाचे आणि इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment