शिवसेना पंढरपूर शहर उपनगराच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 20, 2022

शिवसेना पंढरपूर शहर उपनगराच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस निवेदन

शिवसेना पंढरपूर शहर उपनगराच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस निवेदन

               पंढरपूर (कटुसत्य वृत्त): भारताची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या व महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशभरातून पंढरी नगरीमध्ये येणार्‍या तमाम वारकरी भाविक भक्तासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या व अन्य मागण्यांचे लेखी निवेदन पंढरपूर चे प्रांत अधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी मा. गजानन गुरव साहेब व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब यांना देण्यात आले.

               संपूर्ण देशातून पंढरी नगरीमध्ये येणार्‍या भावीक भक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर समिती मार्फत पूर्वी करण्यात आली होती, परंतु ती आता सध्या बंद असल्याने गोरगरीब भाविक भक्तांची गैर सोय होत आहे, त्यावर लवकरात लवकर उपायोजना व्हावी कारण दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक हा श्रीमंत नाही, गरिबांचा देव म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारकरी भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी तसेच भावीक भक्तांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल रूक्मीणी मंदीरे समीतीने मंदीरा बाहेर ठीकठीकाणी चप्पल स्टॅन्ड उभे केले होते, परंतू त्याची दुरावस्था झालेली असून बेवारस पादञाणे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. स्टॅन्डही वाकडी तिकडी पडलेली आहेत, त्या मुळे अस्वच्छता निर्माण झालेली आहे, तरी त्या मध्ये सुधारना करावी यासाठी आज शिवसेना पंढरपूर शहर उपनगराच्या वतीने शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी लेखी विनंती निवेदन मंदिर समितीचे कर्मचारी मा.प्रकाश पाटील यांच्या  कडे सुपूर्द केले.

               यावेळी शिवसेना विभाग प्रमुख अरुण भाऊ कांबळे, राघवेंद्र एनापुरे, शाखा प्रमुख नारायण ( पिंटू ) रेड्डी, विजय गॅंगने, प्रणीत पवार, संजय शिंगाडे, राहुल पाटील, प्रणीत चव्हाण, सूरज लाडे, स्वप्निल गावडे, अमोल कांबळे, राहुल ठोकळे, आकाश बतकुल, चेतन आसबे, शेखर ननवरे, अक्षय आठवले, दादा सरवदे, प्रितिश चव्हाण, किरण शिकलगर, अजय पवार, शिवसेना कार्याध्यक्ष अनिल कसबे, अमोल पाटसकर,  तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages