बेकायदा दस्त नोंद थांबवा...!सुरवसे पाटील यांनी दिला आक्रोश आंदोलनाचा इशारा...!

लोणी काळभोर (कटुसत्य वृत्त): हवेली क्र.आठ चे प्रभारी सह दुय्यम निबंधक अमित राऊत हे शासकीय लोकसेवक असताना आर्थिक लाभघेण्यासाठी नियमांचे उल्लंघन करून बेकायदा दस्त नोंदणी केली आहे. यापूर्वी हे महाशय हवेली क्रमांक 17चे प्रभारी दुय्यम निबंधक असताना एक हजाराहून अधिक बोगस नियमितकरण प्रमाणपत्र जोडून दस्तांची नोंदणी केली आहे आणि हे जनतेची मोठी पिळवणूक आहे,पिळवणूक केले नंतर आर्थिक मोबदला देण्यास भाग पाडले जात आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून नोदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य श्रवण हर्डीकर यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष केंद्रित करून प्रभारी दुय्यम निबंधक अमित राऊत यांच्यावर निलंबनची करावी करावी अन्यता नोदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयावर स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे वतीने भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment