सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने आपुलकी प्रतिष्ठानला "श्रीमंती सोलापूरची" पुरस्कार जाहीर

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सोलापूर सोशल फाउंडेशन च्या वतीने आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेला सामाजिक कार्याबद्दल "श्रीमंती सोलापूरची" हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सांगोला येथे गेल्या तीन वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेला "श्रीमंती सोलापूरची" हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण येत्या शनिवारी दि. 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता सिंहगड कॉलेज, कमलापूर ता. सांगोला या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्याचे औचित्य साधून सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना "श्रीमंती सोलापूरची" पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. श्रीमंती सोलापूरची पुरस्काराकरिता निवड समितीने आपुलकी प्रतिष्ठानची निवड केली असून शनिवारी होणाऱ्या या पुरस्कार वितरणासाठी आपुलकीच्या सर्व सदस्यांनी तसेच आपुलकीवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे, अशी विनंती अध्यक्ष राजेंद्र यादव, उपाध्यक्ष दिपक चोथे, सचिव संतोष महिमकर, सहसचिव शरणप्पा हळळीसागर, खजिनदार प्रा. डॉ. एस. के. पाटील, व सर्व सदस्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment