शिक्षक रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे लोकमंगल फाउंडेशनच्या आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 1, 2022

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे लोकमंगल फाउंडेशनच्या आवाहन

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे लोकमंगल फाउंडेशनच्या आवाहन

               सोलापूर (कटुसत्य वृत्त): लोकमंगल फाऊडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या  शिक्षकरत्न पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हयातल्या सर्व स्तरावरील शिक्षकाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.  इच्छुकांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

               पुरस्कारासाठी किमान 12 वर्षे सेवा झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन वरिष्ठ महाविद्यालयीन कीडा आणि कलाशिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.  उपलब्ध  प्रवेशिकातून प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्रत्येकी दोघाना पुरस्कार दिले जातील.  वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, कला शिक्षक आणि कीडा शिक्षक प्रत्येकी एक अशा नऊ शिक्षकाना पुरस्कार दिले जाणार आहेत़.

               शिक्षक म्हणून सेवा करताना ज्यांनी विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविले असतील किवा अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला असेल अशा एका शिक्षकालाही पुरस्कार दिला जातो. शिवाय एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  जिल्ह्यातल्या गुणवंत विद्यार्थ्याच्या शिक्षकाला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. असे  शिक्षकरत्न पुरस्कार योजनेत 11 शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. अडीच हजार रूपयाची पुस्तके आणि सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

               सोलापूर जिल्हयातल्या जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेला आणि महानगरपालिकेच्या एका शाळेला अशा दोन शाळानाही पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

               विहित नमुन्यातले अर्ज खालील दिलेल्या गुगल फॉर्म वर https://drive.google.com/drive/folders/18n2I5FxVkRd5Y_HXgbg3VMlYo4iBO0YH  उपलब्ध असतील. 

               अधिक माहितीसाठी  कार्यालयाचा पत्ता अन्नपूर्णा 13 / अ, सहयाद्री नगर, जुना होटगी नाका, सोलापूर  संपर्कासाठी फोन क्रमांक 0217-2322480 आणि 9657709710 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

               ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगष्टपर्यंत असून तसेच प्रस्ताव फाईल ऑफिसला आणून द्यावेत असे कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages