मतदान केंद्राचे १०० मीटर चे परिसरमध्ये व्यावसायीक दुकाने व आस्थापना बंद ठेवणे

लोणी काळभोर (कटुसत्य वृत्त):- २८/०६/२०२२ च्या आदेशान्वये माहे जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आचारसंहीता दिनांक ०५/०७/२०२२ रोजी पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील. दिनांक ०४/०८/२०२२ रोजी मतदान व दिनांक ०५/०८/२०२२ रोजी मतमोजणी होणार आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील :-
१) लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील लोणीकंद ग्रामपंचायतीत १७ जागेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
लोणीकंद गावठाण ता. हवेली जि. पुणे या ०१ मतदान केंद्रावर
२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील खामगाव टेक ग्रामपंचायतीत ०७ जागेसाठी जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा खामगाव टेक ता. हवेली जि. पुणे या ०१ मतदान केंद्रावर
३) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील टिळेकरवाडी ग्रामपंचायतीत ०९ जागेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक
शाळा टिळेकरवाडी ता. हवेली जि. पुणे या ०१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
सदरचे मतदान सुरळीत व शांततेत पार पाडणेसाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी सदर मतदान केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसराच्या जागेचा प्रचारासाठी व इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने सदर मतदान केंद्राचे १०० मीटर परिसरात निर्बंध घालणे जरुरीचे आहे, अशी माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी, मी संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असा आदेश देतो की, पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील लोणीकंद ग्रामपंचायतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद गावठाण ता. हवेली जि. पुणे ,लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील खामगाव टेक ग्रामपंचायतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव टेक ता. हवेली जि. पुणे व टिळेकरवाडी ग्रामपंचायतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिळेकरवाडी ता. हवेली जि. पुणे च्या १०० मीटर परिसरात ०४/०८/२०२२ रोजी ००.०१ वा. पासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
मतदान केंद्राचे (इमारतीचे) १०० मीटर परिसराचे आतील सर्व व्यावसायीक दुकाने, रेस्टॉरंट, टप-या, (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्व आस्थापना बंद ठेवावेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि. कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील. सदरचा आदेश माझे सही शिक्यानिशी आज दि.०३/०८/२०२२ रोजी दिला आहे.
No comments:
Post a Comment