कुपोषित बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन जयंत पाटील आक्रमक... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 25, 2022

कुपोषित बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन जयंत पाटील आक्रमक...

कुपोषित बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन जयंत पाटील आक्रमक...

आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग...

असंवेदनशील आदिवासी मंत्र्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान नाही ; आक्रमक...

                मुंबई (नासिकेत पानसरे):- कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी  मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे माजी मंत्री आणि गटनेते जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि सर्व आमदारांनी सभात्याग केला.

                राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत मग आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते मात्र योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

                दरम्यान हा प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील आक्रमक झाले आणि आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध करत असल्याचे जाहीर केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages