लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील रमाई तरुण मंडळाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी झाली.
प्रारंभी नगराध्यक्ष अॅड मीनल साठे,दादासाहेब साठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी २५ गोरगरीब महिलांना साड्याचे वाटप करण्यात आल्या.गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व वह्याचे वाटप करण्यात आले.
क्रिकेट व व्हाॅली बाॅल मध्ये नॅशनल टिम मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.मंडळाचे अध्यक्ष नवनाथ थोरात यांनी प्रास्ताविक केले.या प्रसंगी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेविका निर्मला थोरात,सुनिता राऊत,मोहिनी नेटके,अनिता सातपुते,अजिनाथ माळी यांचेसह नगरसेवक व रमाई तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. औदुंबर पवार यांनी सुत्रसंचलन केले.
No comments:
Post a Comment