डीसीपी पराग मणेरे यांच्या निलंबनाचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

डीसीपी पराग मणेरे यांच्या निलंबनाचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द

डीसीपी पराग मणेरे यांच्या निलंबनाचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द

                मुंबई, (नासिकेत पानसरे):- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी अर्थात ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा धडाकाच शिंदे फडणवीस सरकारने लावलेला आहे.यामध्ये माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी निगडीत असलेल्या कथित खंडणी प्रकरणी मविआ सरकारने डीसीपी पराग मणेरे यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने रद्द केला आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, विरोधक या निर्णयावर काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.

                गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तत्कालीन मविआच्या उद्धव ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी डीसीपी पराग मणेरे सेवेतून निलंबित केले होते. या सोबतच खंडणी व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले डीसीपी पराग मणेरे यांच्यावर ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई सुरू करून त्यांना निलंबित केले होते. ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यात सत्तांतर होताच शिंदे फडणवीस सरकारने मणेरे यांच्या निलंबनाचा रद्द केला असून त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे.या निर्णयामुळे अनेक शंकाकुशांना वाव मिळत आहे. 

                आता पर्यंत मविआ सरकारने घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय रद्द करण्याचा धडाका या शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे त्यावरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सुडाने वागत आहे का असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages