नवोदय पात्र विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 1, 2022

नवोदय पात्र विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा

नवोदय पात्र विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा

                     कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):  उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या शाळेतील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा पार पडला जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथील शाळेत प्रवेश पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद कन्या शाळेतील शालेय सेवा समितीच्या अध्यक्षा सौ पूजा ताई देशमाने यांच्या वतीने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान मुरुड. कै. गंगाधर महादेव देशमाने यांच्या स्मरणार्थ विद्यार्थिनींना साहित्य ठेवण्यासाठी पेटी,सन्मानचिन्ह कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नितीन भेंडे यांच्या हस्ते कू. कार्तिकी नागनाथ माळी,पौर्णिमा बालाजी भांड, सिद्धी अशोक शिंदे, तनिष्का संदीप मगर, स्वरांगी भालेराव या मुलींना वाटप करण्यात आले.तसेच शालेय सेवा समितीच्या वतीने पाण्याचा जार, सन्मान चिन्ह,सन्मान पत्र देण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने बँकेचे मॅनेजर श्री नितीन भेंडे,यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच तडवळे येथील शिक्षक प्रेमी नागरीक यांच्या वतीने विविध स्वरूपात तसेच रोख पारितोषिक वितरण करण्यात आले.राज्याच्या कानाकोपऱ्यात जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या शाळा तडवळे चे नाव उज्वल करणारे श्री जगन्नाथ धायगुडे, श्री शहाजी पुरी, मुख्याध्यापक श्री रेहमान सय्यद यांचा ग्रामस्थांच्या व शालेय सेवा समितीच्या वतीने पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल, श्रीफळ,सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नितीन भेंडे उपस्थीत होते तर शालेय सेवा समितीच्या अध्यक्षा सौ पुजाताई देशमाने, उपाध्यक्ष श्री सौदागर होगले, सदस्य कानगे, पवार उपस्थित होते.कार्यक्रमास सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचालन श्री गाडे सरांनी केले तर आभार श्री शहाजी पुरी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages