जलकन्या भक्ती जाधव यांच्या जलसंवर्धन अभियान,सोलापूर संस्थेमार्फत सोलापूर शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील 85 महिलांचा विशेष सन्मान

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC चे चीफ मॉडरेटर,साहित्यिक,विशेष कार्यकारी अधिकारी, मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळ सदस्य स्व.प्रा.मधुकर जाधव सर यांच्या 3 ऱ्या पुण्यतिथी निमित्त जलसंवर्धन अभियान तर्फे सोलापूर शहर आणि परिसरातील एकूण 85 महिलांचा विशेष सन्मान त्यांच्या "मधुमंगल" निवासस्थानी करण्यात आला.फक्त महिलांचा असलेल्या या कार्यक्रमात 97 महिला उपस्थित होत्या.कुटुंब आणि समाज यासाठी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा यात समावेश होता.यातील 80 टक्के महिला या अशा होत्या की त्यांचे योगदान खूप मोठे आहे परंतु त्यांचा कधीच कुठे फारसा सन्मान,सत्कार झालेला नाही.पोलीस उपायुक्त सोलापूर शहर DCP मा.डॉ.दीपाली धाटे व सौ.अस्मिताताई गायकवाड (अस्मिता व्हिजन,मनोरमा परिवार)यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जलकन्या भक्ती मंगल मधुकर जाधव व जाधव परिवार यांच्यामार्फ़त करण्यात आले होते.या पुरस्कारामुळे तळागाळातील काम करणाऱ्या महिलांना नवीन ऊर्जा मिळेल,त्यांना काम करण्यास अधिक स्फूर्ती मिळेल असे मत भक्ती जाधव यांनी व्यक्त केले.मुख्यत्वे यात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या,ST कंडक्टर, कारखान्यात काम करणाऱ्या,लहान लहान गृहोद्योग करणाऱ्या महिलांचा समावेश होता.दारू अड्डा हातोड्याने फोडून उध्दवस्त करणाऱ्या मोटे वस्तीतील नवदुर्गांचाही यात समावेश होता.प्रा.मधु जाधव सर यांचे चिपळूण जि.रत्नागिरी(कोकण)येथील विद्यार्थी तसेच लोटे परशुराम येथील MIDC मधील 200 कारखान्याचे फेडरेशन अध्यक्ष डॉ.प्रशांत पटवर्धन हे ही यावेळी कार्यक्रमात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment