स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 12 व 14 ऑगस्ट रोजी सायक्लोथॉन व मॅरेथॉन रॅलीचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 12 व 14 ऑगस्ट रोजी सायक्लोथॉन व मॅरेथॉन रॅलीचे आयोजन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 12 व 14 ऑगस्ट रोजी सायक्लोथॉन व मॅरेथॉन रॅलीचे आयोजन

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आयोजित होत आहेत. सायक्लोथॉन रॅली शुक्रवार दिनांक 12ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 6.00 वाजता सुरू होणार आहे. ह्या रॅलीची सुरूवात चार पुतळा चौक येथून होणार असून ही रॅली डफरीन चौक, रंगभवन, सातरस्ता, डीआरएम रेल्वे ऑफीस, एम्प्लॉयमेंट चौक यामार्गे चार पुतळा पर्यंत राहणार आहे.

              मॅरेथॉन रॅलीचे आयोजन रविवार  दि.14 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 6.00 वाजता हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथून सुरू होणार आहे. या रॅलीमध्ये शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व शहरातील नागरिक तसेच मान्यवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages