NH- 166 सोलापूर- सांगोला राष्ट्रीय महामार्गावर सांगोला दिशादर्शक व किलोमीटर फलक लावावेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 11, 2022

NH- 166 सोलापूर- सांगोला राष्ट्रीय महामार्गावर सांगोला दिशादर्शक व किलोमीटर फलक लावावेत

NH- 166 सोलापूर- सांगोला राष्ट्रीय महामार्गावर सांगोला दिशादर्शक व किलोमीटर फलक लावावेत

शहीद अशोक कामटे संघटनेचि आग्रही मागणी

                सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने NH- 166 सोलापूर- सांगोला राष्ट्रीय महामार्गावर सांगोला या गावाचे दिशादर्शक व किलोमीटर फलक लावावेत या मागणीचे  निवेदन व सूचना पत्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर विभागाचे प्रकल्प संचालक सुदर्शन चिटणीस यांना नुकतेच देण्यात आले आहे.

                नागपूर- रत्नागिरी या महामार्गावर पैकी सोलापूर- मिरज महामार्गाचे काम पूर्ण झाले असून पैकी सोलापूर पासून मंगळवेढा -सांगोला या मार्गावर कुठेही सांगोला या गावाचा, नावाचा उल्लेख ,किमी ,दिशादर्शक फलक नाही .मराठवाडा ,आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातून येणाऱ्या विविध व्यापारी ,प्रवाशांना त्यामुळे सांगोला गावाला कोणत्या ठिकाणाहून वळण घ्यायचे व येथील असणाऱ्या अंतर याचा अंदाज येत नसल्याने असा स्पष्ट बोर्ड नसल्याने अनेकांना चाचपडत प्रवास करावा लागत आहे. किंबहुना लांबून प्रवास करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी वाटंबरे गावाचा उल्लेख आढळून येतो पण मग सांगोला शहर, तालुका ,गाव किंबहुना त्यापेक्षा छोटे आहे का? असा प्रश्न प्रवाशांना,  नागरिकांना पडला आहे त्यामुळे जागोजागी सांगोला दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी बाहेरील नागरिकांनी केली आहे. या  अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून पूर्तता करावी ही विनंती या विभागाकडे केली आहे.

                राष्ट्रीय महामार्ग झाला रस्ते चांगली झाले पण राष्ट्रीय महामार्ग विभागाला सांगोल्याचा विसर पडलेला दिसतो किमान आता हा महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे आता तरी' एन एच आयने 'याची दखल घेऊन जागोजागी आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ सांगोलाचे फलक लावावेत याकरता आमची संघटना आग्रही आहे. प्रा .नीलकंठ शिंदे सर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages