शिधापत्रिकाधारकांना जुलैच्या धान्यासोबत जूनच्या धान्याचे वितरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 6, 2022

शिधापत्रिकाधारकांना जुलैच्या धान्यासोबत जूनच्या धान्याचे वितरण

शिधापत्रिकाधारकांना जुलैच्या धान्यासोबत जूनच्या धान्याचे वितरण

            पुणे, (कटुसत्य वृत्त): सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील जून २०२२ चे धान्य न  मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना जूनचे धान्य जुलै २०२२ च्या धान्यासह उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. महानगरपालिका हद्दीतील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधील शिधापत्रिकाधारकांनी महानगरपालिकामधील ११ परिमंडळ कार्यालयांच्या अधिनस्त रास्त भाव दुकानदारांकडून ३० जुलैपर्यंत अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages