माढ्यात श्रीसंत ज्ञानराज माऊलीच्या पालखी सोहळ्यातील ४०० वारकऱ्यांना माढेश्वरी अर्बन बॅकेच्या वतीने अन्नदान,गेल्या ४ वर्षापासुन सुरु आहे उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 6, 2022

माढ्यात श्रीसंत ज्ञानराज माऊलीच्या पालखी सोहळ्यातील ४०० वारकऱ्यांना माढेश्वरी अर्बन बॅकेच्या वतीने अन्नदान,गेल्या ४ वर्षापासुन सुरु आहे उपक्रम

माढ्यात श्रीसंत ज्ञानराज माऊलीच्या पालखी सोहळ्यातील  ४०० वारकऱ्यांना माढेश्वरी अर्बन बॅकेच्या वतीने अन्नदान,गेल्या ४ वर्षापासुन सुरु आहे उपक्रम 

             माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यात श्री. माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने श्री ज्ञानराज माऊलीच्या  पालखी सोहळ्यातील ४००  वारकर्याना अन्नदान करण्यात आले.

             मागील ४ वर्षापासुन बॅकेच्या वतीने हा विधायक उपक्रम सुरु आहे.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विठ्ठल भक्तांना अन्नदान करुन आत्मिक समाधान लाभत असल्याने हा उपक्रम राबवत असल्याचे बॅकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी बोलताना सांगितले.

             दिंडीतील वारकर्यानी पावसाच्या सरी बरसत असतानाच  ग्यानबा तुकाराम चा जयघोष करीत  ठेका धरला. जालना जिल्ह्य़ातील डोंगरगाव येथिल श्री पावनधाम  आश्रमा पासुन सुरु झालेला हा पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी  माढ्यात विसावला.

             माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने पालखीतील  वारकर्याना साई पब्लिक स्कुल च्या प्रांगणात भोजन देण्यात आले तसेच त्यांच्या राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी माढेश्वरी अर्बन बँकेचे पालखी सोहळ्यातील वारकर्यानी आभार मानुन कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी बॅकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत,मुख्य कार्यकारी अधिकारी दतात्रय मुळे,बॅकेच्या संचालिका मंगल लुणावत,निलेश कुलकर्णी,संजय गायकवाड,अभिजीत लुणावत,विपुला लुणावत,राजकुमार भोळे यांचेसह बॅकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages