जिल्हा न्यायालयात तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वच्छतागृह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 5, 2022

जिल्हा न्यायालयात तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वच्छतागृह

जिल्हा न्यायालयात तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वच्छतागृह

            पुणे, (कटुसत्य वृत्त):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने जिल्हा न्यायालयात तृतीयपंथींयांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आली आहे.

            तृतीयपंथींयांच्या हक्क व अधिकाराबाबत जनजागृती व्हावी तसेच सामान्य नागरिकांमध्ये त्यांना स्वीकारण्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा न्यायालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान तृतीयपंथीय समूहासाठी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याबाबत समस्या मांडण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सादर केलेल्या स्वच्छतागृहाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही सुविधा करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages