सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 5, 2022

सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

 सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

            पुणे (कटुसत्य वृत्त):-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत २०२२-२३ या शैक्षणीक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांतर्गत ६१ व्या सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल (सबज्युनिअर / ज्युनिअर) स्पर्धेचे आयोजन १४ वर्षाखालील मुले व १७  वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात करण्यात येणार आहे.

            जिल्हा क्रीडा परिषद पुणे, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १४ वर्षाखालील गटातील खेळाडू (सब ज्युनियर) १ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा, तर  १७ वर्षाखालील गटातील खेळाडू (ज्युनियर) १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

            सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पुणे महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, येरवडा, पुणे येथे तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 15, प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे ११ जुलै २०२२ पर्यंत सादर करता येतील.  पुणे ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येरवडा, पुणे येथे ११ ते १३ जुलैपर्यंत सादर करावेत.

            फुटबॉलमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले प्रवेश अर्ज विहित मुदतीत सादर करावे.  प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर स्पर्धेचे स्थळ व दिनांक कळविण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages