डी.फार्मसी प्रवेशासाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस १५ जुलै पर्यंत मुदतवाढ

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे येथे सुविधा केंद्रावर मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उपलबध
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे येथे औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्मसी),पदवी(बी.फार्मसी) व पदवीत्तर (एम.फार्मसी) अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी येथील प्रथमवर्ष पदविका/डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्ज सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीत डी.फार्मसी प्रवेश बाबत मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे.या केंद्रामध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारे गुणपत्रके,प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे व संपूर्ण प्रवेशप्रक्रिया या बदल सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे.या प्रवेशप्रक्रियेसाठी व अर्ज पडताळणीसाठी विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत.
त्यामध्ये :-
- प्रथम पर्यायामध्ये सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरणे,पडताळणी व निश्चिती करणे.
- दुसऱ्या पर्यायामध्ये विद्यार्थी महाविद्यालयास (अर्ज सुविधा केंद्र ( एफ.सी सेन्टर )) न जात इंटरनेटचा वापर करून सुविधा केंद्र निवडणे व पडताळणी व निश्चिती करणे.
या सुविधा केंद्रमध्ये बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदविका (डी.फार्मसी) प्रथम वर्ष प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक ०८ /०७/२०२२ पर्यंत स्वीकारले जाणार होते परंतु शासनाने त्यास १५ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रे पडताळणी होणार आहे.तरी विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रावर येताना आपले सर्व ओरिजिनल कागदपत्रे व दोन प्रति त्याच्या झेरॉक्स सेट सोबत घेऊन येणे.खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४००/- रुपये व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३००/- रुपये शुल्लक ऑनलाईन नेट बँकिंग द्वारे किंवा एटीएम कार्ड द्वारे महाराष्ट्र शासनाकडे भरणा करायचा आहे.तरी फॉर्म भरण्यासाठी सुविधा केंद्रावर येताना एटीएम कार्ड घेऊन येणे,याचबरोबर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या विविध शंका व अडचणी याबाबत मोफत सखोल मार्गदर्शन या महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांमार्फत उपलब्ध होणार आहे.तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी केले आहे.याबाबत अधिक माहितीसाठी प्रा.ए.एम.तांबोळी (९९७५४०२४६५), डॉ.एम.जी.शिंदे (८३०८४८७२७८) प्रा.आर.एम.कोळी (९८६०६०१७१०) व श्री पी.एस.लोखंडे (९८२३१०७३७१) यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment