श्री गणपती फार्मसी महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- अकोले (खुर्द), ता माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालायकडून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मोगगावकर पालखी सोहळा पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जात असताना बुधवारी अकोले येथे मुक्कामी होता आणि त्यावेळी दिंडीतील असंख्य वारकऱ्यांवर मोफत तपासणी करून त्यावर उपचार करण्यात आले व त्यांना अन्नदानही करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ. सतीश वाघावकर व डॉ. विनायक गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्दी, खोकला, थंडी, ताप,अंगदुखी, गुडघेदुखी इत्यादी आजारावर औषधे वितरित केली व त्यांचे समुपदेशन केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे संलग्नित राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.सुकुमार लांडे व प्रा. शिवराज ढगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काम केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड विजयराव हिरवे उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. वारकऱ्यांची सेवा करून मिळणाऱ्या समाधानाचा महिमा संस्थेचे सचिव डॉ.आर. डी. बेंदगुडे यांनी सांगितला. या आरोग्य तपासणी शिबिराचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत मिसाळ यांनी केले.
No comments:
Post a Comment