शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 14, 2022

शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत

 शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत

                  सोलापूर (कटुसत्य वृत्त): सोलापूर जिल्ह्यातील एकूण १६ शासकीय वसतिगृहे व २ शासकीय निवासी शाळा यांना आर्थिक वर्ष २०२२-२३ करिता आवश्यक स्टेशनरी व इतर नित्योपयोगी वस्तु उपलब्ध करून देणेसाठी स्पर्धात्मक दरपत्रक सहायक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर कार्यालयाकडून मागविण्यात येत आहे. या दरपत्रक निविदा सूचनेची सविस्तर माहिती www.solapur.nic. या संकेतस्थळावर दि.१४ जुलै २०२२ पासून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर दराचा नमुना अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण, सोलापूर कार्यालयात दि.२० जुलै २०२२ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असून दरपत्रक स्विकारण्याची अंतिम तारीख दि.२६ जुलै  २०२२ पर्यंत आहे, तरी इच्छुक संस्थांनी व पुरवठादारांनी उपरोक्त नमूद कालावधीत दर पत्रक सादर करावेत, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आडे यांनी कळवले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages